Sunday, October 06, 2024 04:45:25 AM

Dr. Snehlata Deshmukh
मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरुंचे निधन

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. मागील अनेक दिवसांपासून स्नेहलता देशमुख आजारी होत्या.

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरुंचे निधन

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. मागील अनेक दिवसांपासून स्नेहलता देशमुख आजारी होत्या. 

रांगोळी, भरतकाम - विणकाम, गायन अशा विविध कलांमध्ये पारंगत असलेल्या स्नेहलता देशमुख यांची डॉक्टर होण्याची आणि कर्करोगावर उपचार करण्याची इच्छा होती. पण त्या काळी कर्करोगावरच्या शस्त्रक्रियेसाठी मुलींना प्रवेश नव्हता. अखेर स्नेहलता देशमुख यांनी अर्भकांवरील शस्त्रक्रिया या विषयाचा सखोल अभ्यास केला. त्या अर्भकांवरील शस्त्रक्रियेत पारंगत झाल्या. विख्यात शल्यविशारद म्हणून त्यांनी ख्याती मिळवली. वैद्यकीय क्षेत्रातले अनेक मानसन्मान मिळवले. वयाच्या पन्नाशीच्या आसपास त्यांनी वैद्यकीय प्रशासकाच्या क्षेत्रात पाऊल टाकायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी खास दिल्लीला जाऊन वैद्यकीय प्रशासनाचा (हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) अभ्यासक्रम पूर्ण केला. यानंतर १९९० मध्ये त्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठाता झाल्या. त्यांच्याच प्रयत्नांमुळे शासनाकडून धारावीत गर्भवती महिलांना ‘फॉलिक अ‍ॅसिड’साठीच्या गोळ्या वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू झाला. यामुळे धारावीतल्या महिलांच्या पोटी जन्मणाऱ्या बाळांच्या पाठीवर आवाळू येण्याचे प्रमाण कमी झाले. 

राज्य शासनाने १९९५ साली मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून डॉ. स्नेहलता देशमुख यांची नियुक्ती केली. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याच्या आई आणि वडिलांचे नाव लिहिण्याची पद्धत सुरू झाली. आधी प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याच्या वडिलांचे नाव असायचे पण आईच्या नावाचा उल्लेख नव्हता. डॉ. स्नेहलता देशमुख यांनी विद्यापीठात वैद्यकीय प्रशासनासाठीचा पदविका अभ्यासक्रम सुरू केला. 


सम्बन्धित सामग्री