मुंबई : अमेरिकेत लवकरच राष्ट्रपतीपदाची निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती तथा रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प देखील मैदानात आहेत. आगामी निवडणुकीत आपण जिंकलो तर गुगलविरुद्ध खटला चालविण्याची मागणी करू असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. गुगल कंपनी केवळ त्यांच्या बद्दलच 'वाईट गोष्टी' प्रसारीत करते, असा दावा त्यांनी केला आहे. ट्रम्प यांनी मागील २०१९ च्या निवडणुकीतही २०१९ गूगलसंदर्भात असाच दावा केला होता. अशी माहिती वॉशिंग्टन पोस्टने दिली आहे.
काय म्हणाले ट्म्प?
- गुगल अवैध पद्धतीने माहिती प्रदर्शित करण्यासंदर्भात यंत्रणेचा वापर करते
- डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्या संदर्भात गुगल चांगलं बोलते
- निवडणुकीत हस्तक्षेप केल्याबद्दल गुगलवर फौजदारी खटला चालवणे अपेक्षित
- अमेरिकेचा राष्ट्रपती झाल्यानंतर कायद्यांन्वये खटला चालवण्याची विनंती करणार