गांदरबल : जम्मू-काश्मीरमधील गांदरबलच्या सोनमर्गमध्ये अतिरेकी हल्ला झाला. एका बोगद्याचे काम सुरू होते. तिथे खासगी कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत होते. या भागात अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमधील दोघे जम्मू काश्मीरचे रहिवासी आहेत. हल्ला करुन अतिरेकी पळून गेले. सुरक्षा पथक अतिरेक्यांना शोधत आहे.
ओमर अब्दुल्लांच्या गांदरबलमध्ये हल्ला
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत गांदरबल आणि बडगाम या दोन मदारसंघांतून विजयी झाले. यातील गांदरबलमध्ये रविवारी अतिरेकी हल्ला झाला. अतिरेकी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला. हल्लेखोरांना सोडणार नाही. सुरक्षा पथकं योग्य ती कारवाई करतील, असे त्यांनी सांगितले.
मृतांची नावं
- फहिमन नसीर - सेफ्टी मॅनेजर - बिहार
- अनिल शुक्ला - मेकॅनिकल मॅनेजर - मध्य प्रदेश
- मोहम्मद हनीफ - ताहीर अँड सन्स कंपनी - बिहार
- डॉ. शहनवाझ - जम्मू काश्मीर
- कलीम - ताहीर अँड सन्स कंपनी - बिहार
- शशी अवरोल - डिझायनर - जम्मू काश्मीर
- गुरमीत सिंह - रिगर