तुम्हालाही पेरू आवडतो का? अनेक लोकांना पेरू फार आवडतो. विशेष म्हणजे हिवाळ्यात पेरू खाणं हे शरीरासाठी फायदेशीर ठरतं. पेरूमध्ये व्हिटॅमिन अ,क, फॉलिक ॲसिड, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशिएम, लोह अशी अनेक पोषकतत्वे असतात. त्यातल्या त्यात पेरू भाजून खाल्याने देखील अनेक फायदे होतात.
पेरू भाजून खाल्ल्याचे फायदे काय?
पेरू भाजल्यामुळे पेरूला एक वेगळीच चव प्राप्त होते. याशिवाय पेरूतील पोषकतत्त्वे अधिक चांगल्या प्रमाणात शरीरात विरघळायला मदत होते.
पेरूत फायबर्स असतात. जे अन्न पचायला मदत करतात.मात्र हाच पेरू भाजून खाल्ल्याने पेरूतील फायबर्स आणि पोषकतत्त्व जास्त चांगल्या पद्धतीने अन्न पचायला मदत करतात. भाजलेला पेरू जर काळ्यामिठासोबत खाल्ला तर हे आणखी फायद्याचं ठरू शकतं.
काळं मीठ हे पचनासाठी चांगलं मानलं जातं. त्यामुळे ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांना डॉक्टर सकाळी चिमूटभर मीठ गरम पाण्यात टाकून ते पाणी पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळे हे काळं मीठ जर भाजलेल्या पेरू सोबत खाल्लं तर दुहेरी फायदा मिळू शकतो.
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात भाजलेला पेरू खाल्ल्यामुळे तुम्हाला फायदाच होईल.
हिवाळ्यात अनेकांना जास्त काळ सर्दी खोकळा राहून कफाचा त्रास होतो. अशा व्यक्तीसाठी भाजलेला पेरू कोणत्या औषधापेक्षा कमी नाही . कारण भाजलेल्या पेरुने कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते.
काळं मीठ आणि भाजलेला पेरू एकत्र खाल्ल्याने शरीराला एक चांगलीच उर्जा मिळते. त्यामुळे मन प्रसन्न राहायला मदत होते.
पेरू भाजल्यावर त्यात असलेल्या शर्करेची पातळी कमी होते. त्यामुळे रक्तात साखर विरघळण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. पेरूतल्या फायबर्समुळे भूक नियंत्रणात राहते, वजन नियंत्रणात राहायाला मदत होते.
पेरूचे अनेक फायदे असल्याने आणि त्याच बरोबर पेरू भाजून खाल्ल्याने अनेक फायदे होतात, चव वाढते त्याचबरोबर अनेक आजारही दूर होतील.