Wednesday, October 02, 2024 11:05:24 AM

Distribution of textbooks will start in schools
सोमवारपासून महापालिका शाळांमध्ये पाठ्यपुस्तके वाटपाला सुरूवात

शहरातील विविध शासकीय, अनुदानित आणि महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे पहिल्याच दिवशी नवी पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. २७ मेपासून शाळांना पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.

सोमवारपासून महापालिका शाळांमध्ये पाठ्यपुस्तके वाटपाला सुरूवात

 

मुंबई : शहरातील विविध शासकीय, अनुदानित आणि महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे पहिल्याच दिवशी नवी पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. २७ मेपासून शाळांना पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. एक लाख १७ हजार ३३० विद्यार्थ्यांसाठी महापालिकेकडे पुस्तके आली आहेत. केंद्र राज्य शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत सरकारी, अनुदानित महापालिका शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. शाळा उघडण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या पुस्तके मिळावीत, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री