Tuesday, April 29, 2025 08:07:43 AM

'वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेलेलो नाही'

भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांची पोस्ट चर्चेत आहे.

वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेलेलो नाही

डोंबिवली : भाजपा नेते तथा नवनिर्वाचित आमदार रवींद्र चव्हाण यांनी एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट केली. आहे. या पोस्टमध्ये त्यांनी माध्यमांनी त्यांच्याबद्दल चुकीचे वृत्त चालवले असल्याचे सांगितले आहे. पदासाठी मोर्चेबांधणी केल्याचे वृत्त त्यांनी फेटाळले आहे. चव्हाण यांनी मतदारसंघात आहे आणि वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेलेलो नाही अशी माहिती या पोस्टद्वारे दिली आहे.

रवींद्र चव्हाण यांची पोस्ट

गेल्या २-३ दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली मतदारसंघातच आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. या दोन दिवसात किंवा काल मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाहीये. त्यामुळे कृपया प्रसार माध्यमांनी कोणत्याही प्रकरणाची शहानिशा करून बातम्या चालवाव्यात, ही नम्र विनंती !   

 

 

 

 


सम्बन्धित सामग्री