मुंबई : बीडमधील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वारंवार आक, आका, आका अशा चर्चा पाहायला मिळाली. जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत प्रसाद काथे यांनी आकाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आकाचा आका धनंजय मुंडे आहेत असा गौप्यस्फोट आमदार सुरेश धस यांनी केला.
हेही वाचा : सुरेश धस राजीनामा देणार. पण...
धस यांनी पहिल्यांदाच धनंजय मुंडेचं नाव घेतलं
'कराड हा छोटा आका आहे. मी सुरूवातीपासून म्हटलं होतं. कराडवर 302 आणि मोक्का लागणार आणि आज कराडवर मोक्का लागला आहे. आता मोठ्या आकाने ठरवावं आपण कुठे आहोत असं म्हणत आकाचा आका धनंजय मुंडे आहेत असा गोप्यस्फोट धस यांनी जय महाराष्ट्रच्या मुलाखतीवेळी केला. सातपुडा या मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक घेतली. फक्त बैठकीबाबत माझं मुंडेवर आक्षेप आहे. मी अजून धनंजय मुंडेंचा नाव यात घेतलेलं नाही असंही धस यांनी जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
धस यांनी मुलाखतीत केलेली वक्तव्ये
'आका म्हणजे धनंजय मुंडे'
'धनंजय मुंडे गोत्यात येणार'
'देशमुखांच्या अखेरच्या आरोपीला फाशी मिळेपर्यंत पाठपुरावा करेन'
'हत्येच्या आरोपींना फाशीच झाली पाहिजे'