Sunday, December 22, 2024 10:12:41 PM

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी घेतले प्रभू रामाचे दर्शन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले.

देवेंद्र फडणवीसांनी घेतले प्रभू रामाचे दर्शन

अयोध्या : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. देवेंद्र फडणवीस अयोध्येत तीन वेळा कारसेवेत अर्थात करसेवेत सहभागी झाले होते. यामुळे प्रभू रामाचे दर्शन घेतल्यावर त्यांना आनंद झाला. 

दर्शन घेतल्यानंतर श्री रामजन्मभूमी न्यासाच्या पुस्तिकेत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या संदेश पुस्तिकेत त्यांनी लिहिले की, 'ज्या रामाच्या मंदिर पुननिर्माणात कारसेवक म्हणून सेवा देण्याची संधी मला मिळाली, त्याच मंदिराचे पुननिर्माण झाल्यानंतर प्रत्यक्ष रामाचे  दर्शन घेण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य आहे. मी प्रभू रामाचा आभारी आहे. राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या या यज्ञात आहुती देणार्‍या सर्वांना मी नमन करतो. विशेषत्वाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, या न्यासाचे सर्व विश्वस्त आणि मंदिर निर्माणातील विश्वकर्मांच्या दुतांना मी प्रणाम करतो. जय श्रीराम.'

अयोध्येतील राममंदिरात दर्शन घेतल्यानंतर बाहेर देवेंद्र फडणवीस यांनी  बांधकाम कामगारांसोबत छायाचित्र काढून घेतले. महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलेल्या भाविकांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत हनुमान गढी मंदिरात मारुतीरायाचे दर्शन घेतले.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo