मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. फडणवीसांना धमकी देण्यात आली आहे. धमकी येताच फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. फडणवीसांच्या सुरक्षिततेसाठी फोर्स वनचे १८ जवान तैनात करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त नियमानुसार राज्याचे मंत्री म्हणून फडणवीस यांना सरकारी संरक्षण आहेच.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपाने २८८ पैकी १४८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या व्यतिरिक्त चार जागा भाजपाने मित्रपक्षांना दिल्या आहेत. महायुतीतील इतर घटकपक्ष उर्वरित जागा लढवत आहेत. निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस हे राज्यातले स्टार प्रचारक आहेत. निवडणुकीतला बंडखोरांचा प्रश्न सोडवण्याची मुख्य जबाबदारीही फडणवीसांकडेच आहे. यामुळे फडणवीसांच्या धावपळीत वाढ झाली आहे. या वातावरणात धमकी आल्यामुळे फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.