मुंबई : विधानसभा निवडणुकीचे हिरो ठरले भाजपाचे देवेंद्र फडणवीस. फडणवीस यांनी जरांगेचे राजकारण, व्होट जिहाद या सर्व गोष्टींवर हुशारीने मात केली. विकास प्रकल्प तसेच लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा विविध कल्याणकारी योजना यांच्या माध्यममातून देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची प्रतिमा सुधारण्यावर भर दिला. महायुतीतील इतर घटक पक्षांशी उत्तम समन्वय राखून तसेच दुखावलेल्यांची समजूत काढून आणि बेरजेचे राजकारण करुन फडणवीस यांनी महायुतीची बाजू भक्कम केली. या प्रयत्नांचा फायदा फडणणवीस यांना मिळाला. विशेष म्हणजे फडणवीसांनी मराठवाडा आणि विदर्भातील जागा भाजपाकडे खेचून आणल्या. निवडणूक महायुतीने लढवली तरी विजयाचे सर्वांनी एकमुखाने देवेंद्र फडणवीस यांनाच दिले.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मविआ सत्तेवर येईल अशी हवा होती, मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा निकालच बदलला. महायुतीची सत्ता राखत मविआला पराभूत करण्यात देवेंद्र फडणवीसांच्या रणनीतीला यश आले. खऱ्या अर्थाने फडणवीस हे विधानसभा निवडणुकीच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.
विरोधकांच्या आरोपांच्या तोफांना फडणवीसांनी जशास तसं उत्तर दिलं आणि सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर केला. विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात महायुतीला यश मिळाले. यासाठी देवेंद्र फडणवीसांनी रात्रंदिवस मेहनत आणि कष्ट घेतले.देवेंद्र फडणवीसांनी नागपूर पश्चिम हा आपला बालेकिल्ला राखलाच, त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक मतदारसंघात मविआच्या अनेक नेत्यांना धूळ चारण्यात फडणवीसांना यश आलंय.
राज्याच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्वबळावर 122 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला साथीला घेऊन देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची सत्ता राखली आणि मविआला धूळ चाखली. शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळवत महाराष्ट्रात भाजपाच किती सरस आहे हेही फडणवीसांच्या राजकीय खेळीने सिद्ध झालं. राज्याच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाने उत्कृष्ट कामगिरी करत बाजी मारली. महाराष्ट्रात सत्ता राखण्यात महायुतीचा वाटा असला तरी खरे हिरो ठरले ते भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तर तो त्यांचा मुख्यमंत्रीपदावराच हक्कच ठरेल.
महायुती - 231 जागांवर विजयी किंवा आघाडीवर
भाजपा - 133 जागांवर विजयी किंवा आघाडीवर
शिवसेना - 57 जागांवर विजयी किंवा आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस - 41 जागांवर विजयी किंवा आघाडीवर