Thursday, September 12, 2024 05:47:39 PM

Devendra Fadnavis
'योजना बंद पाडण्याचे विरोधकांचे प्रयत्न फसले'

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात. ही कल्याणकारी योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांनी खोटे अर्ज भरले.

योजना बंद पाडण्याचे विरोधकांचे प्रयत्न फसले

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात. ही कल्याणकारी योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांनी खोटे अर्ज भरले. योजनेबाबत अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. पण योजना बंद पाडण्याचे विरोधकांचे प्रयत्न फसले. या शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय विरोधकांवर टीका केली. 

महिलांनी मानले आभार

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालीय. अमरावती टपाल कार्यालयात जमा झालेले दोन हप्त्यांचे पैसे काढण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केलीय. पैसे मिळाल्यानंतर सर्व महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पहिला हफ्ता जमा झालेला आहे. प्रति महिना पंधराशे प्रमाणे दोन महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. महिलांच्या खात्यात पैसे आल्यानंतर त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले असून  या योजनेमुळे महिलांना सक्षम व्हायला मदत होईल अशी प्रतिक्रिया गोंदिया जिल्ह्यातील महिलांनी व्यक्त केली आहे. 


सम्बन्धित सामग्री