Tuesday, April 08, 2025 05:57:07 PM

फडणवीसांनी काढली बंडोबांची समजूत

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस पुण्यात आहेत. ते पुणे तसेच आसपासच्या जिल्ह्यांतील बंडखोरांची समजूत काढत आहेत.

फडणवीसांनी काढली बंडोबांची समजूत

पुणे : भाजपा नेते देवेंद्र फडणवीस पुण्यात आहेत. ते पुणे तसेच आसपासच्या जिल्ह्यांतील बंडखोरांची समजूत काढत आहेत. अनेक बंडखोरांची समजूत काढण्यात फडणवीस यशस्वी झाल्याचे समजते. पुढील दोन दिवसांत भाजपाचे अनेक बंडखोर माघार घेणार असल्याचे वृत्त आहे. याआधी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपाच्या निवडक बंडखोरांची समजूत काढली. फडणवीस यांनी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचीही भेट घेतली. बोरिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर झाल्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी बंड करुन अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर मात्र शेट्टींनी पक्षाचेच काम करणार असल्याचे जाहीर केले. 


सम्बन्धित सामग्री