Tuesday, July 02, 2024 08:04:33 AM

Medha Patkar
मेधा पाटकर यांना न्यायालयाचा दणका

दिल्लीच्या साकेत न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना बदनामी केल्याप्रकरणी दोषी ठरवले.

मेधा पाटकर यांना न्यायालयाचा दणका

नवी दिल्ली : दिल्लीच्या साकेत न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना बदनामी केल्याप्रकरणी दोषी ठरवले. नर्मदा आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या मेधा पाटकर यांच्या विरोधात दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मानहानी केल्याचा खटला दाखल केला होता. या खटल्यात  न्यायदंडाधिकारी राघव शर्मा यांनी मेधा पाटकर यांना दोषी ठरवले. मेधा पाटकर यांना दोषी ठरल्यामुळे दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

मेधा पाटकर यांनी एका मुलाखतीत आणि पत्रकात विनय कुमार सक्सेना यांच्याविरोधात वक्तव्य केले. 
पाटकर यांचे वक्तव्य बदनामीकारक असल्याची सक्सेना यांनी तक्रार केली. 
पाटकर यांच्याविरोधात विनय कुमार सक्सेना यांनी गुन्हेगारी कलमांतर्गत बदनामी केल्याचा खटला दाखल केला. 
खटला दाखल झाला तेव्हा विनय कुमार सक्सेना अहमदाबादस्थित एनजीओ नॅशनल कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीजचे प्रमुख होते.
पाटकर यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल झाले होते. 
विनय कुमार सक्सेना यांनी खटला जिंकला आहे. 
मेधा पाटकर यांच्यावर दोष सिद्ध झाले आहेत. 
मेधा पाटकर यांना कायद्यानुसार दोन वर्षे तुरुंगवास आणि किंवा दंड अशा शिक्षा होऊ शकतात.


सम्बन्धित सामग्री