मुंबई : शिवसेनेचे दीपक सावंत बंडाच्या पवित्र्यात आहेत. राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत विधानसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची तयारी करत आहेत. त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक चाचपणी सुरू केली आहे. दीपक सावंत जुलै २०१२ मध्ये विधान परिषदेवर निवडून गेले. कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा संधी दिलेली नाही. यामुळे पुन्हा आमदार होण्यास इच्छुक असलेले दीपक सावंत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. ते डिसेंबर २०१४ मध्ये राज्याचे आरोग्यमंत्री झाले. याच कार्यकाळात त्यांना भंडारा आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते. सध्या राजकीय वर्तुळाच्या परिघावर असलेले दीपक सावंत निवडणूक लढवून वर्तुळाच्या केंद्राजवळ पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत.
शिवसेना नेते दीपक सावंत
- २००४ - विधानपरिषदेवर
- २००६ - विधानपरिषदेवर
- २०१२ - विधानपरिषदेवर
- २०१४ - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसेच भंडारा, धाराशिव (उस्मानाबाद) आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे (औरंगाबाद) पालकमंत्री