Thursday, June 27, 2024 08:16:24 PM

Karnataka
कर्नाटकमध्ये महागाई विरोधात आंदोलन करताना मृत्यू

काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये पेट्रोल, डिझेल महागले. या दरवाढीविरोधात आंदोलन करत असलेल्यांपैकी एकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

कर्नाटकमध्ये महागाई विरोधात आंदोलन करताना मृत्यू

बंगळुरू : काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर तीन रुपयांची आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर तीन रुपये आणि तीन पैसे एवढी वाढ झाली. या दरवाढीविरोधात आंदोलन करत असलेल्यांपैकी एकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत व्यक्ती भाजपाचे माजी आमदार आहेत. एम बी भानुप्रकाश असे त्यांचे नाव होते. ते ६९ वर्षांचे होते. भानुप्रकाश यांच्या निधनाचे वृत्त कळताच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शोक व्यक्त करत ट्वीट केले.


सम्बन्धित सामग्री