Saturday, October 05, 2024 04:56:44 AM

Chhatrapati Sambhajinagar
लाडकी बहीणवरुन श्रेयवादाची लढाई

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या राज्य शासनाच्या योजनेवरुन श्रेयवादाची लढाई सुरू आहे.

लाडकी बहीणवरुन श्रेयवादाची लढाई

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या राज्य शासनाच्या योजनेवरुन श्रेयवादाची लढाई सुरू आहे.  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. 

लाडकी बहीण योजनेशी संबंधित फलकावरुन अजित पवारांचे नाव गायब झाले आहे. तर फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाव एका कोपऱ्यात आहे. यामुळे सत्तेतला प्रत्येक राजकीय पक्ष लाडकी बहीण योजनेचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत लाखो पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे तीन हप्ते म्हणून ४५०० रुपये मिळाले आहेत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाखो महिलांना नोंदणी केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे हजारो लाभार्थी आहेत. 


सम्बन्धित सामग्री