धुळे: कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ याने शेतकरी त्रस्त आहे. त्यातच आता कापसाला भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. त्यातच धुळे जिल्ह्यात अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाव वाढेल या आशेने आपल्या घरातच कापूस साठवून ठेवला आहे. विधानसभा निवडणूक झाली एक हाती भाजपाला सत्ता मिळाली आता सरकार बसेल आणि कापसाच्या किमतीत वाढ होईल या अपेक्षाने शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कापसाला सात हजाराच्या वर भाव गेला नाही परंतु या सरकारने आता कपाशीला आठ हजार ते दहा हजार पर्यंत भाव द्यावा आणि सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे अशी अपेक्षा धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी केले आहे.
मागील काही महिन्यांपासून कापसाच्या भावात वाढ झाली नाही, कापसाच्या उत्पादनावर चक्रीवादळे, पाऊस आणि कीड यांचा परिणाम झाल्याने उत्पादन कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर, आयात किंवा निर्यात धोरणांच्या बदलामुळेही कापसाच्या भावावर प्रभाव पडू शकतो.
त्यातच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाव वाढेल या आशेने आपल्या घरातच कापूस साठवून ठेवल्या चिंता अधिक वाढली आहे. कापसाला किमान आठ हजार ते दहा हजार पर्यंत भाव मिळावा अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून त्यांची ही अपेक्षा पूर्ण होणार का? हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.