मुंबई : राष्ट्रवादी पक्षाची दुसरी उमेदवार यादी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवार यादीत सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुणे पोर्शे अपघात प्रकरणात टिंगरे अडचणीत आले होते. टिंगरे यांना उमेदवारी दिल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे.
दुसरीकडे अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली. सना मलिक नवाब मलिक यांची मुलगी आहे. नवाब मलिक हे मनी लॉन्ड्रिग प्रकरणात तुरूंगाबाच्या बाहेर आहेत. वादग्रस्त उमेदवारांना संधी दिल्यामुळे राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवार यादीची चर्चा आहे.