Saturday, October 05, 2024 08:48:55 PM

Narendra Modi
'काँग्रेसने तरुणांना नशेच्या आहारी नेलं'

मोदींनी पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विरासत ए बंजारा वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

काँग्रेसने तरुणांना नशेच्या आहारी नेलं

पोहरादेवी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विरासत ए बंजारा वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन केले. तसेच विविध विकास प्रकल्पांचे लोकापर्ण, उद्घाटन केले. याप्रसंगी झालेल्या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. 

काँग्रेसना गरीबांना अजून गरीब करायचे आहे. तरुणांना व्यसनांच्या विळख्यात ढकलायचे आहे. काँग्रेससाठी देश हा फक्त एका घराण्यापुरता मर्यादीत आहे. काँग्रेस मागासवर्गीय, दलित, आदिवासी यांना चांगली वागणूक देत नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी पोहरादेवीच्या विकासासाठी निधी दिला. महाविकास आघाडीच्या काळात ते काम बंद पाडण्यात आले. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले तेव्हा हे काम पुन्हा सुरू करण्यात आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेसच्या काळात शहरी नक्षलवाद फोफावला आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

दिल्लीत कोट्यवधींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यावेळी जी धरपकड झाली त्यातून ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार काँग्रेसचात नेता असल्याचे उघड झाले. काँग्रेस पक्ष तरुणांना व्यसनांच्या विळख्यात ढकलत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत पाठवत होती. महाविकास आघाडी सरकार कंत्राटदार नेमत ती वाटून खात होती. कर्नाटकमध्ये सत्तेत येताना काँग्रेसने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. काँग्रेस फक्त सत्तेत येण्यासाठी आश्वासने देते. ती आश्वासने पाळत नाही. तेलंगमध्येही त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली पण कर्जमाफी देणे टाळले. महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सिंचनाचे प्रकल्प रोखले पण महायुतीने विविध विकासकामांना गती दिली; असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

पंतप्रधान मोदींच्या हस्ते नगारा भवनाचं उद्घाटन
पंतप्रधान मोदींच्या हस्ते पोहरादेवीची आरती
पंतप्रधान मोदींनी वाजवला नगारा

'डबल इंजिन सरकार सर्वांना न्याय देत आहे'
'मोदींच्या आशीर्वादाने राज्याचा विकास'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्तुती


सम्बन्धित सामग्री