Wednesday, August 21, 2024 04:58:22 PM

Congress
काँग्रेस सात आमदारांवर कारवाई करणार ?

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटली. या प्रकरणात काँग्रेसने शुक्रवार १९ जुलै रोजी आमदारांची बैठक बोलावली आहे. बैठकीत मते फुटण्याच्या मुद्यावर चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे.

काँग्रेस सात आमदारांवर कारवाई करणार

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटली. या प्रकरणात काँग्रेसने शुक्रवार १९ जुलै रोजी आमदारांची बैठक बोलावली आहे. बैठकीत मते फुटण्याच्या मुद्यावर चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. ज्यांची मते फुटली त्या सात आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. 

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवार १२ जुलै रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसकडे ३७ आमदारांची मते होती. प्रज्ञा सातव यांना २५ मतं देऊन काँग्रेसकडे १२ मतं शिल्लक होती. शिउबाठाकडे १७ मतं होती, काँग्रेसच्या ६ मतांची नार्वेकरांना गरज होती. पण प्रत्यक्षात नार्वेकरांना पहिल्या पसंतीची २२ मतं मिळाली. जयंत पाटलांना फक्त राशपचीच १२ मतं मिळाली, म्हणजेच काँग्रेसची उरलेली सात मतं फुटली. काँग्रेसच्या या मतफुटीचा फायदा अजित पवारांना झाला आहे. अजित पवारांना जास्तीची ७ मते मिळाली आहेत. या घडामोडींमुळे मविआतीस धूसफूस उघड झाली आहे. शिउबाठाने त्यांची नाराजी जाहीररित्या व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारांची शुक्रवार १९ जुलै रोजी बैठक होत आहे.


सम्बन्धित सामग्री