नवी दिल्ली : प्रियांका गांधी वाड्रा वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी प्रियांका यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राहुल गांधी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी रायबरेली आणि वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी विजय झाल्यानंतर राहुल यांनी वायनाडमधून राजीनामा दिला होता आणि रायबरेलीचा खासदार म्हणून शपथ घेतली होती. यामुळे वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून प्रियांका गांधी वाड्रा निवडणूक लढवणार आहेत.
केरळमधील पलक्कड आणि चेलक्करा या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत. पलक्कडमधून काँग्रेसने राहुल मामकूटाथिल आणि चेलक्करा रम्या हरिदास यांना उमेदवारी जाहीर केली आहे.