Tuesday, July 02, 2024 08:13:17 AM

MLC Election 2024
विधान परिषदेसाठी महायुतीत साठमारी

विधान परिषदेसाठी महायुतीत साठमारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विधान परिषदेसाठी महायुतीत साठमारी

मुंबई : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे आणि मतमोजणी १ जुलै २०२४ रोजी होईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घाईघाईने विधान परिषदेसाठी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. यामुळे विधान परिषदेसाठी महायुतीत साठमारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विधान परिषद, महाराष्ट्र
मतदान - २६ जून २०२४
मतमोजणी - १ जुलै २०२४

घोषित उमेदवार कोण आहेत ते पाहुयात

अभिजित पानसे कोकण पदवीधर मनसे
शिवाजी नलावडे मुंबई शिक्षक, राष्ट्रवादी
ज मो अभ्यंकर मुंबई शिक्षक, शिउबाठा
अनिल परब मुंबई पदवीधर, शिउबाठा

या घोषित उमेदवारीमुळे विधान परिषद निवडणुकीसाठी रस्सीखेच कशी होईल? ते पाहुयात,

अभिजित पानसे कोकण पदवीधर मनसे विरुद्ध निरंजन डावखरे संभाव्य उमेदवार, भाजपा 
शिवाजी नलावडे मुंबई शिक्षक राष्ट्रवादी विरुद्ध ज मो अभ्यंकर मुंबई शिक्षक शिउबाठा
अनिल परब मुंबई पदवीधर, शिउबाठा विरुद्ध डॉ. दीपक सावंत संभाव्य उमेदवार, शिवसेना
किशोर दराडे नाशिक शिक्षक शिउबाठा विरुद्ध उमेदवार घोषित नाही

आधीची स्थिती जाणून घेऊ, 

मुंबई पदवीधर मतदारसंघ - विलास पोतनीस, शिउबाठा - ७ जुलै २०२४ रोजी कार्यकाळ संपणार
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ - निरंजन डावखरे, भाजपा - ७ जुलै २०२४ रोजी कार्यकाळ संपणार
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ - किशोर दराडे, शिउबाठा - ७ जुलै २०२४ रोजी कार्यकाळ संपणार
मुंबई शिक्षक मतदारसंघ - कपिल हरिश्चंद्र पाटील, समाजवादी गणराज्य पक्ष - ७ जुलै २०२४ रोजी कार्यकाळ संपणार


सम्बन्धित सामग्री