Wednesday, August 21, 2024 03:53:50 PM

Eknath Shinde
'विकासकामांचं भूमिपूजन, उद्घाटन मोदींच्याच हस्ते'

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विकासकामांचं भूमिपूजन करतात त्या विकासकामांचं नंतर उद्घाटन पण करतात, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

विकासकामांचं भूमिपूजन उद्घाटन मोदींच्याच हस्ते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विकासकामांचं भूमिपूजन करतात त्या विकासकामांचं नंतर उद्घाटन पण करतात, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईत पंतप्रधान मोदींच्या हस्ते २९ हजार ४०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन ,लोकार्पण आणि पायाभरणी झाली. याप्रसंगी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले. 

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

मोदींच्या कामात प्रभू राम आणि बाबासाहेबांचे संविधान - शिंदे
ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन मोदी करतील, त्या प्रकल्पांचे भूमिपजून पण करतील - शिंदे

मोदी यशस्वी, लोकप्रिय पंतप्रधान - शिंदे
मोदी महाराष्ट्रात आनंद आणतात - शिंदे

मुख्यमंत्री शिंदेंनी केले पंतप्रधानांचे स्वागत
मोदींमुळे भारताची दुप्पट वेगाने प्रगती- शिंदे
मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती- शिंदे

पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालेली विकासकामं

ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाची पायाभरणी - खर्च १६ हजार ६०० कोटी रुपये
गोरेगाव मुलुंड लिंक रोड  प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाची पायाभरणी - ६३०० कोटी रुपये
कल्याण यार्डाच्या पुनर्रचनेची तसेच तुर्भे येथील गतिशक्ती मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनलची पायाभरणी

लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नव्या फलाटांचे लोकार्पण
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधील फलाट क्र. १० आणि ११ चा विस्तारीत भाग यांचे लोकार्पण
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रारंभ - ५६०० कोटी रुपये


सम्बन्धित सामग्री