Tuesday, April 08, 2025 01:20:50 PM

कोपरखैरणेमधील चर्चमध्ये आग

कोपरखैरणेमधील चर्चमध्ये आग लागली आहे.


कोपरखैरणेमधील चर्चमध्ये आग

नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणेमधील चर्चमध्ये आग लागली आहे. चर्चमधील तळमजल्याला आग लागल्याची माहिती आहे. आगीमुळे चर्चबाहेर एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

कोपरखैरणेमधील चर्चमध्ये आग लागली. आग लागल्यामुळे चर्चमध्ये आलेले अनेक जण पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर अडकले होते. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अग्निशमन जवानांनी आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवत आग विजवली.

हेही वाचा : ...मजा घेण्याचा प्रश्न नाही; फडणवीसांनी जरांगेंना सुनावले

 

नाताळ निमित्त कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेल्या स्टेज, लाईटची वायर आणि बाहेर उभ्या असलेल्या काही वाहनाना आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.


सम्बन्धित सामग्री