Sunday, September 08, 2024 06:55:28 AM

Eknath Shinde
कारगिल युद्धातील वीरांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

कारगिल युद्धातील वीरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले.

कारगिल युद्धातील वीरांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई : कारगिल युद्धातील वीरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. वीरांचे शौर्य कायम आठवणीत ठेऊन कोणत्या ना कोणत्या स्वरुपात देशाची सेवा केली पाहिजे असे या प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या युद्धात हुतात्मा  झालेल्या महाराष्ट्रातल्या सहा जवानांचे स्मरण केले. आज २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे असेही ते म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी कारगिल युद्धातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, सैनिक कधीही माजी होत नसतो. याची जाणीव आम्हाला आहे. म्हणूनच त्याच्या कल्याणासाठी राज्य शासनाने महत्वाचे निर्णय घेतलेत..शासनाने माजी सैनिकांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. खारघर इथं माजी सैनिकांचं विश्रामगृहही उभ करणार आहोत. मेस्कोचे विविध उपक्रम, माजी सैनिकांना रोजगार संधी, त्यांच्या वेतनातील तफावती दूर करणार आहोत. वीर जवानांच्या कुटुंबांची काळजी घेण्यासाठी येत्या काळात आणखी काही महत्वाचे निर्णयही घेणार आहोत असेही ते म्हणाले. देशाच्या सीमेचं रक्षण करणारे जवान आणि त्यांच्या कल्याणासाठी जे जे काही करता येईल त्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. हे आमचं कर्तव्य आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


सम्बन्धित सामग्री