Monday, December 16, 2024 09:25:12 PM

Chhagan Bhujbal Rejects Cabinet Position
भुजबळ अजून संपलेले नाहीत ?

&quotमी नाराज आहे. पुढे काय ? ज्यांनी मला डावललं, त्यांना तुम्ही प्रश्न विचारायला हवेत.''

भुजबळ अजून संपलेले नाहीत

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील नऊ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. छगन भुजबळ यांच्या नावाची मंत्रिमंडळात चर्चा होती, परंतु त्यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. यामुळे त्यांची नाराजी लपून राहिली नाही.

भुजबळ यांनी आपल्या नाराजीचे संकेत दिले असून, "मी नाराज आहे. पुढे काय? ज्यांनी मला डावललं, त्यांना तुम्ही प्रश्न विचारायला हवेत," असं सांगितलं. याच दरम्यान, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठवण्याचा प्रस्ताव मिळाल्याची माहिती आहे. पण भुजबळ यांनी तो प्रस्ताव नाकारला आणि नाशिकला जाऊन समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी भेट घेण्याचा निर्णय घेतला. या भेटीमध्ये भुजबळ आगामी राजकीय भूमिकेबद्दल चर्चा करणार आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, भुजबळ ओबीसी नेते असल्यामुळे त्यांच्याबद्दल पक्षाने घेतलेला निर्णय विरोधकांच्या टीकेला कारण ठरला आहे. भुजबळ मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे त्यांनी आपल्या पक्षावरच आक्रमक भूमिका घेतली आहे. आता येत्या 2 ते 3 दिवसांत भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार की वेगळा निर्णय घेणार, हे स्पष्ट होईल.

हे ही वाचा : 'पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य' - सुधीर मुनगंटीवार


नाराज भुजबळांना लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरु
नाराज भुजबळांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दखल घेतली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीने छगन भुजबळ, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, धर्मरावबाबा अत्राम या नेत्यांना डच्चू दिला, ज्यामुळे भुजबळ नाराज झाले. मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांचा पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना दखल घेत राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन मंत्री मकरंद पाटील यांचे भाऊ खासदार नितीन पाटील यांच्या जागी छगन भुजबळांना राज्यसभा देण्याचा प्रस्ताव पक्षाने ठेवला आहे. जय महाराष्ट्राला पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे. याआधी भुजबळांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo