Thursday, September 19, 2024 03:47:06 AM

Chetan Patil finally arrested
चेतन पाटीलला अखेर अटक

चेतन पाटीलला अखेर शनिवारी अटक करण्यात आली.

चेतन पाटीलला अखेर अटक

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याने काही दिवसांपासून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पुतळ्या कोसळला कसा याप्रकरणी राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यासंदर्भात चेतन पाटील याला  शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले होते आणि शनिवारी त्याला अटक करण्यात आली. चेतन हा राजकोट किल्ल्याचा स्थापत्य सल्लागार आहे. त्याच्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. चेतन पाटील याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अधिक माहिती लवकरच मिळेल. 

 


सम्बन्धित सामग्री