Sunday, April 27, 2025 11:13:58 AM

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वेळापत्रकात पाच ऑक्टोबरपासून बदल करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वेळापत्रकात पाच ऑक्टोबरपासून बदल करण्यात येणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून २० जलद लोकल फेऱ्या दादरवरून सुटणार आहेत. सीएसएमटी, दादर स्थानकातील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. करोना, टाळेबंदी काळानंतर मध्य रेल्वेवरील लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गर्दीचा भार सर्व लोकल फेऱ्यांवर पडत आहे. परिणामी दररोज अत्यंत गर्दीतून धक्के खात प्रवास करावा लागतो. लोकलमध्ये बसण्यास जागा मिळावी यासाठी दादर, भायखळ्यावरून सीएसएमटी गाठून प्रवासी पुन्हा कल्याण दिशेकडील प्रवास करतात. सीएसएमटीवरून २५४ जलद लोकल धावतात. फलाट क्रमांक १०-११ चे दोन्ही बाजूच्या फलाटात रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकलच्या पूर्व-पश्चिम दोन्ही बाजूने चढता-उतरता येणार आहे. आता यापुढे जात दादर येथून जलद लोकल सोडण्यात येणार आहेत. 

 

 


सम्बन्धित सामग्री