Monday, September 16, 2024 01:54:07 PM

Chandrapur
दिल्लीची खुर्ची महाराष्ट्राच्या हाती

दिल्लीची खुर्ची महाराष्ट्राच्या हाती आहे. दिल्लीत पंतप्रधानांसाठी नवी लाकडी खुर्ची तयार करण्याचे काम चंद्रपूर जिल्ह्यात आले आहे.

दिल्लीची खुर्ची महाराष्ट्राच्या हाती

चंद्रपूर : दिल्लीची खुर्ची महाराष्ट्राच्या हाती आहे. दिल्लीत पंतप्रधानांसाठी नवी लाकडी खुर्ची तयार करण्याचे काम चंद्रपूर जिल्ह्यात आले आहे. या कामासाठी चंद्रपूरचे सागवान लाकूड वापरले जाणार आहे. ही माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. याआधी संसद भवन आणि राम मंदिराच्या निर्मितीत चंद्रपूरच्या सागवान लाकडाचा वापर करण्यात आला आहे. 

पंतप्रधानांची विशेष खुर्ची तसेच दिल्लीतील इतर महत्त्वाचे फर्निचर तयार करण्यासाठी चंद्रपूरचे सागवान लाकूड वापरले जाणार आहे. या कामासाठी ३ हजार घन फूट सागवान चंद्रपुरातून रवाना होणार आहे. रविवार ८ सप्टेंबरपासून सागवान दिल्लीला पाठवण्यास सुरुवात होणार आहे. 

पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय मंत्री मंडळ सभागृह, केंद्रीय मुख्य सचिवांचे दालन तयार करण्यासाठी सागवान वापरणार आहे. देशात सर्वोत्तम सागवान चंद्रपुरात असल्याने येथील लाकडापासून दिल्लीत महत्त्वाचे फर्निचर तयार केले जाणार आहे. 


सम्बन्धित सामग्री