Sunday, March 16, 2025 05:36:44 AM

बजावला मतदानाचा हक्क

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडत आहेत.

बजावला मतदानाचा हक्क
chandrakant patil voted

पुणे, १३ मे २०२४, प्रतिनिधी : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडत आहेत. 
पुण्यातील कोथरूड भागामध्ये  सर्वसामान्य नागरिकांसोबत रांगेत उभं राहून चंद्रकांत पाटील यांनी मतदान केले आहे. 'रांगेत उभं राहून मतदान केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांशी गप्पाही मारता आल्या' 'भाजपाचा विजय निश्चित आहे असेच चित्र दिसून येत आहे', असे त्यांनी यावेळी म्हटले. 
सोमवारी, १३ मे रोजी महाराष्ट्रासह देशभरातील एकूण ९६ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगांव, रावेर, शिर्डी, अहमदनगर दक्षिण, पुणे, शिरूर, मावळ, बीड , जालना, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे.


सम्बन्धित सामग्री