नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सहभागी होण्यास सरकारी कर्मचाऱ्यांना बंदी घालण्यात आली होती. नेहरू पंतप्रधान असल्यापासून लागू असलेली ही बंदी अखेर मोदी सरकारने उठवली आहे. काँग्रेस सरकारचा निर्णय मोदी सरकारने फिरवला आहे. मोदी सरकारच्या बंदी उठवण्याच्या निर्णयाचे संघाकडून स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्रात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक जाहीर होण्याआधीच संघकार्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या सहभागावरील बंदी उठवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिनिधी आणि भाजपाचे प्रतिनिधी यांची बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या बैठकीला विशेष महत्त्व आहे.