नवी दिल्ली : पेपरफुटीला आळा घालण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती दोन महिन्यांत त्यांचा अहवाल सादर करेल. या अहवालाच्या आधारे केंद्रीय शिक्षण मंत्रालय स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थेत सुधारणा करणार आहे. समिती स्थापनेव्यतिरिक्त केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या संचालकाची हकालपट्टी करण्याचाही निर्णय घेतला आहे. सुबोध कुमार यांची हकालपट्टी करून प्रदीप सिंह खरोला यांच्याकडे राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या संचालक या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पेपरफुटीबाबत केंद्र सरकारची कारवाई
राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या संचालकाची हकालपट्टी
सुबोध कुमार यांची हकालपट्टी, प्रदीप सिंह खरोला नवे संचालक