Thursday, September 12, 2024 05:18:17 PM

Railway
जालना-जळगाव नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी

अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या योजनांसाठी केंद्र सरकारने पुरेशी तरतूद केली. या पाठोपाठ महाराष्ट्राला केंद्राने आणखी एक भेट दिली

जालना-जळगाव नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी

नवी दिल्ली : अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या योजनांसाठी केंद्र सरकारने पुरेशी तरतूद केली. या पाठोपाठ महाराष्ट्राला केंद्राने आणखी एक भेट दिली. जालना-जळगाव या नव्या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. नव्या १७४ किमी रेल्वे मार्गासाठी ७ हजार १०५ कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली आहे. या रेल्वे मार्गामुळे उत्तर महाराष्ट्र रेल्वेद्वारे राज्याच्या उर्वरित भागाशी जोडला जाईल. जागतिक वारसा असलेली अजिंठा आणि वेरुळची लेणी रेल्वे मार्गाने जोडली जातील. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. उत्तर महाराष्ट्र ते मराठवाडा असा हा रेल्वे मार्ग राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यास मदत करेल. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना-जळगाव रेल्वे मार्गाला मंजुरी मिळताच केंद्राचे आभार मानले. पंतप्रधान मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या दोघांचेही फडणवीस यांनी आभार मानले.

 


सम्बन्धित सामग्री