Wednesday, August 21, 2024 04:15:50 PM

Bypoll
पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर

देशातील सात राज्यांतील १३ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने प्रत्येकी चार तर भारतीय जनता पार्टीने दोन जागा जिंकल्या.

पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील १३ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने प्रत्येकी चार तर भारतीय जनता पार्टीने दोन जागा जिंकल्या. आम आदमी पार्टी, द्रमुक आणि अपक्ष यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने वर्चस्व कायम राखले. उत्तराखंडमध्ये काँग्रेसने बद्रीनाथची जागा राखली आणि बसपाच्या ताब्यात असलेली दुसरी जागा जिंकली. हिमाचल प्रदेशात काँग्रेसने दोन आणि भाजपाने एक जागा जिंकली. पंजाबमध्ये आपने एक जागा जिंकली. बिहारमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाला. तामिळनाडूत द्रमुकने एक जागा जिंकली. मध्य प्रदेशात भाजपाने एक जागा जिंकली. 

  1. पश्चिम बंगाल - ४ जागा - सर्व जागांवर तृणमूल काँग्रेसचा विजय
  2. उत्तराखंड - २ जागा - सर्व जागांवर काँग्रेसचा विजय
  3. हिमाचल प्रदेश - ३ जागा - काँग्रेसचा दोन आणि भाजपाचा एका जागेवर विजय
  4. मध्य प्रदेश - १ जागा - भाजपाचा विजय
  5. पंजाब - १ जागा - 'आप'चा विजय
  6. बिहार - १ जागा - अपक्ष विजयी
  7. तामिळनाडू - १ जागा - द्रमुकचा विजय


सम्बन्धित सामग्री