Tuesday, June 25, 2024 11:41:46 AM

Dombivli blast
डोंबिवलीच्या रसायन कंपनीत स्फोट, १६ मृत्यू

डोंबिवली स्फोटामुळे १६ जणांचा मृत्यू झाला, या स्फोट प्रकरणी मलय मेहता याला २९ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

डोंबिवलीच्या रसायन कंपनीत स्फोट १६ मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या रसायन कंपनीत शुक्रवार २४ मे २०२४ रोजी बॉयलरचा अर्थात धुरांड्याचा स्फोट झाला. या स्फोटामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. या प्रकरणात ठाणे जिल्ह्यातील न्यायालयाने कंपनीचा मालक मलय मेहता याला २९ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. स्फोट प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. 

पोलिसांनी कंपनीचे मालक, संचालक, व्यवस्थापन कर्मचारी आणि कारखान्यावर देखरेख करणारे अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आरोपींवर भारतीय दंड संहितेअंतर्गत ज्वलनशील पदार्थ आणि स्फोटक पदार्थांद्वारे दुखापत करणे आणि निष्काळजी वर्तन करणे, सदोष मनुष्यवध  (कलम ३०४) असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा आणि स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


सम्बन्धित सामग्री