Tuesday, September 17, 2024 01:45:56 AM

BJP vs SUBT
संभाजीनगरमध्ये भाजपा - शिउबाठा आमनेसामने

छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर भाजपा - शिउबाठा आमनेसामने आले. पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

संभाजीनगरमध्ये भाजपा - शिउबाठा आमनेसामने

छत्रपती संभाजीनगर : जळगाव दौऱ्यावर जाण्यासाठी पंतप्रधान मोदी रविवारी २५ ऑगस्ट रोजी दिल्लीहून छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आले. मोदींचे आगमन होताच छत्रपती संभाजीनगर विमानतळाबाहेर शिउबाठाने आंदोलन सुरू केले. बदलापूरच्या घटनेचा निषेध म्हणून पंतप्रधान मोदींसमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमदार आदित्य ज्या हॉटेलमध्ये उतरले होते त्या हॉटेलबाहेर आंदोलन करुन उत्तर दिले. भाजपाचे आंदोलन सुरू होताच शिउबाठाच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि ते रस्त्यावर उतरले. रस्त्यावर भाजपा - शिउबाठा आमनेसामने आले. पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. 

भाजपाने आंदोलन करताना उद्धव सरकारच्या काळात महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा झाल्याचे आंरोप करत वेगवेगळी उदाहरणे दिली. आमदार आदित्य यांना दिशा सालियन प्रकरणात आंदोलकांनी जाब विचारला. भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य यांच्यावर गंभीर आरोप केले. दिशा सालियनवर सामूहिक अत्याचार झाला आणि यामध्ये आदित्य ठाकरेही सहभागी होते, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला. दिशा सालियन प्रकरणात लहान मुलांची काय भूमिका होती असा सवाल नितेश यांनी उपस्थित केला.


सम्बन्धित सामग्री