Saturday, September 07, 2024 05:21:31 PM

BJP and RSS
'विधानसभेसाठी सहकार्य करा'

भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी बंद दाराआड चर्चा केली.

विधानसभेसाठी सहकार्य करा

मुंबई : भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी बंद दाराआड चर्चा केली. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीसाठी पूर्ण सहकार्य करा, अशी विनंती भाजपाच्या नेत्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना केली. राजकीय गणिताचा भाग म्हणून अजित पवारांना सोबत घेतले आहे. यामुळे त्यांच्यावर आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर थेट टीका करणे टाळा; अशीही विनंती भाजपाकडून संघाच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्याचे वृत्त आहे.

भाजपाच्या महाराष्ट्रातील आणि राष्ट्रीय राजकारणातील काही निर्णयांमुळे नाराज झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मनधरणी करण्यासाठी मुंबईत बैठक झाली. या बैठकीतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. संघ आणि भाजपाची बैठक झाल्यानंतर रात्री उशिरा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या ही भेट आटोपून अजित पवार दिल्लीतून निघाले. लवकरच दिल्लीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राजकीय मुद्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. 


सम्बन्धित सामग्री