Saturday, September 28, 2024 01:58:12 PM

BJP
विधानसभेसाठी राज्याची जबाबदारी दोन केंद्रीय मंत्र्यांना

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. या निकालाची पक्षाने गंभीर दखल घेतली आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्याची जबाबदारी दोन केंद्रीय मंत्र्यांना दिली आहे.

विधानसभेसाठी राज्याची जबाबदारी दोन केंद्रीय मंत्र्यांना

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. या निकालाची पक्षाने गंभीर दखल घेतली आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्याची जबाबदारी दोन केंद्रीय मंत्र्यांना दिली आहे. महाराष्ट्रासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे निवडणूक प्रभारीपदाची आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवडणूक सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी या संदर्भातील घोषणा प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली.


सम्बन्धित सामग्री