Thursday, September 05, 2024 12:17:36 PM

BJP and Shiv Sena
विधानसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. भाजपाच्या सुकाणू समितीची दोन दिवसांची बैठक मुंबईत होत आहे. ही बैठक १८ आणि १९ जुलै अशी दोन दिवस चालेल. सुकाणू समितीच्या बैठकीला भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाचे राज्यातील इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील. भाजपाप्रमाणेच शिवसेनेतही विधानसभेसाठी हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची मुंबईत बैठक बोलावली आहे. 

महाराष्ट्रात २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक झाली होती. मतदान २१ ऑक्टोबर रोजी झाले होते आणि मतमोजणी २४ ऑक्टोबर रोजी रोजी झाली होती. फक्त एका टप्प्यातील राज्यातील २८८ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. यामुळे यंदाही सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 


सम्बन्धित सामग्री