Thursday, July 04, 2024 08:38:45 AM

MLC Election
विधान परिषदेसाठी भाजपाचे उमेदवार

जुलै महिन्यात होणार असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाने पाच उमेदवार जाहीर केले आहेत.

विधान परिषदेसाठी भाजपाचे उमेदवार

मुंबई : जुलै महिन्यात होणार असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाने पाच उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली. विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताना भाजपाने ओबीसी नेत्यांना प्राधान्य दिले आहे. 

विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीसाठी मंगळवार २ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. मतदान १२ जुलै रोजी होईल आणि मतमोजणी त्याच दिवशी मतदानानंतर सुरू होईल. रिक्त जागांपैकी महायुतीकडे नऊ, तर महाविकास आघाडीकडे दोन जागा निवडून आणण्याचे संख्याबळ आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी नियमानुसार गुप्त मतदान होणार आहे.

मातोश्रीचा तिसरा आमदार ?

शिउबाठाने उद्धव यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. नार्वेकर विजयी झाल्यास मातोश्री बंगल्यातले ३ सदस्य आमदार होतील. सध्या विधान परिषदेवर उद्धव आणि विधानसभेवर आदित्य हे आमदार आहेत. 

काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी

दिवंगत राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे.


सम्बन्धित सामग्री