Friday, June 21, 2024 11:42:25 AM

Nitish Kumar
बिहारच्या मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हाताला असह्य वेदना होऊ लागल्यामुळे पाटणा येथील मेदांता रुग्णालयात जाऊन उपचार घेतले.

बिहारच्या मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हाताला असह्य वेदना होऊ लागल्यामुळे पाटणा येथील मेदांता रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. ऑर्थोपेडिक अर्थात हाडांच्या डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर नितीश पुन्हा घरी परतले आहेत. जनता दल संयुक्त पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची २९ जून रोजी बैठक आहे. या बैठकीचे नियोजन आणि मुख्यमंत्री कार्यालयातील इतर जबाबदाऱ्या हाताळणाताना त्यांना शनिवारी हाताला वेदना होऊ लागला. त्रास बळावल्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. 
 


सम्बन्धित सामग्री