मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक दुकानदारांकडून परवानगीपेक्षा अधिकच्या फटाक्यांची साठवणूक केली जात आहे तसेच अनेक जण परवानगीविनाच फटाक्यांची सर्रास विक्री करत असल्याच्या आरोपांची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.
परवानाधारक दुकानदारांकडून परवानगीपेक्षा अधिकच्या फटाक्यांच्या साठवणूकीची
महानगरपालिकेने पाहणी करावी. पाहणीत परवानाधारक दुकानदारांकडून परवानगीपेक्षा अधिकच्या फटाक्यांची साठवणूक केली जात असल्याचे किंवा काही दुकानदार परवानगीविना फटाकेविक्री करत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.