Sunday, March 09, 2025 04:14:06 AM

कोयता गँगने बारामती पुन्हा हादरली; तरुणाचा कोयत्याने वार करून खून

बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम कॉलेज रस्त्यावर 23 वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. यामुळे बारामती शहरात खळबळ माजली आहे, कारण हा गेल्या सहा महिन्यातील हा तिसरा खून ठरला आहे

कोयता गँगने बारामती पुन्हा हादरली तरुणाचा कोयत्याने वार करून खून

बारामती :  शहरात पुन्हा एकदा कोयता गँगने धाडसी घटना घडवली आहे. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास, बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम कॉलेज रस्त्यावर 23 वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. यामुळे बारामती शहरात खळबळ माजली आहे, कारण हा गेल्या सहा महिन्यातील हा तिसरा खून ठरला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर अनिकेत सदाशिव गजाकस या युवकावर कोयत्याने तीव्र वार केले गेले. गंभीर जखमी झाल्यामुळे अनिकेत गजाकस याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार, मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून हा हल्ला घडल्याचे समजत आहे.

बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणी अनिकेत गजाकस यांच्या कुटुंबीयांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांकडून म्हणावा तसा या खूनाचा तपास वेगाने सुरू असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांच्या पथकाने शोध घेणे सुरू ठेवले आहे.

या खूनामुळे बारामती शहरात एकच धडक भरली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये असे हिंसक प्रसंग वाढले असून, पोलिस यंत्रणा अधिक सजग होण्याची आवश्यकता आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू ठेवले असून, लवकरच आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


सम्बन्धित सामग्री