मुंबई : गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रखर दिव्यांच्या लेझर किरणांमुळे काही भक्तांच्या डोळ्यांना इजा झाल्याचे गतवर्षी उघड झाल्यानेृृ यंदाच्या गणेशोत्सवात या दिव्यांना पूर्णत: प्रतिबंध केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाने मान्य केले. तसेच गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषणासंबंधीच्या नियमांचे पालन करून आवाजाच्या भिंती (डीजे) उभारण्यास मुभा देण्यात आली.