Friday, July 05, 2024 08:00:35 PM

Ban on heavy vehicles from Sion Bridge
शीव पुलावरून अवजड वाहनांना बंदी

मध्य रेल्वेच्या शीव स्थानकातील जुन्या पूलाच्या पुनर्बाधणीच्या कामामुळे पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

शीव पुलावरून अवजड वाहनांना बंदी
sion railway station

मुंबई : मध्य रेल्वेच्या शीव (सायन) स्थानकातील ११० वर्षे जुना पूल पाडून त्याची पुनर्बाधणी तसेच पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकांचे काम करण्यात येणार आहे. यासाठी या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. परिणामी, 'बेस्ट'ने बसच्या २३ मार्गामध्ये बदल केला आहे. पुढील १८ महिने पुलाचे काम सुरू राहणार आहे. शीव रेल्वे स्थानकातील तब्बल ११० वर्षे जुना पूल पाडून त्याची पुर्नबांधणी करण्याच्या कामाला लवकरच सुरूवात केली जाणार आहे.


सम्बन्धित सामग्री