मुंबई : जागावाटपाच्या मुद्यावरुन मविआत मतभेद वाढले आहेत. शिउबाठा मुंबई आणि विदर्भातील जागांसाठी आग्रही आहे. तर काँग्रेस शिउबाठाला जास्त जागा देण्यास अनुत्सुक आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या वागणुकीमुळे शिउबाठाची नाराजी आणखी वाढली आहे. वाद विकोपाला जाऊ नये आणि तिढा सुटावा यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांची नेमणूक करण्यात आली आहे.