Monday, March 31, 2025 05:14:16 AM

बच्चू कडू यांनी लावले वानखेडेंच्या विजयाचे फलक

काँग्रेस नेते बळवंत वानखडे यांच्या विजयानंतर बच्चू कडू यांनी अभिनंदनाचे फलक लावले आहेत. अमरावती शहरात या फलकांमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

बच्चू कडू यांनी लावले वानखेडेंच्या विजयाचे फलक

अमरावती : काँग्रेस नेते बळवंत वानखडे यांच्या विजयानंतर बच्चू कडू यांनी अभिनंदनाचे फलक लावले आहेत. अमरावती शहरात या फलकांमुळे चर्चेला उधाण आलं आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव करून महाविकास आघाडीचे आमदार बळवंत वानखडे हे विजयी झाल्यानंतर शहरात आमदार बच्चू कडू यांनी वानखडे यांच्या अभिनंदनाचे फलक लावले आहेत. अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात भूमिका घेतली होती.  मैदान मिळवण्यावरूनही वाद झाला होता.  त्यानंतर हे फलक  लागले आहेत.  त्यामुळे अमरावतीमध्ये या फलकाची जोरदार चर्चा सुरू आहे. 
 


सम्बन्धित सामग्री