Sunday, September 08, 2024 10:27:48 AM

Babajani Durrani
बाबाजानी दुर्राणी राशपत

विधान परिषदेतील सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून राशपत प्रवेश केला.

बाबाजानी दुर्राणी राशपत

छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेतील सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून राशपत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून विधानसभा आणि विधान परिषद यापैकी कोणत्याही सभागृहात जाण्याची संधी मिळणार नाही याची खात्री झाल्यानंतर दुर्राणींनी राशपत प्रवेश केला. 

पक्षात फूट पडण्याआधी बाबाजानी दुर्राणी यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर पाठवण्यात आले. ते १० जुलै २०१८ पासून विधान परिषदेचे आमदार होते. कार्यकाळ संपला आणि पुन्हा संधी मिळणार नाही याची जाणीव होताच त्यांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी बातचीत केली. अखेर बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून राशपत प्रवेश केला. 

कोण होते बाबाजानी दुर्राणी ?

बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी नगरपरिषदेचे सदस्य म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. नंतर ते पाथरी नगरपरिषदेचे अध्यक्ष आणि वक्फ बोर्डाचे सदस्य झाले. ते २००४ ते २००९ आणि २०१२ ते २०१८ या काळात विधानसभेवर आमदार होते. राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांना २०१८ मध्ये विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली. 


सम्बन्धित सामग्री