Thursday, November 21, 2024 03:57:02 PM

Average voter turnout in Maharashtra is 65.11%
महाराष्ट्रात सरासरी 65.11 टक्के मतदान

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीत सरासरी 65.11 टक्के मतदान झाले.

महाराष्ट्रात सरासरी 6511 टक्के मतदान

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात पार पडलेल्या मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 65.11 टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभा सार्वत्रिक निवडणुक पार पडली. विधानसभा निवडणुकीसाठी काही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळाली. महाराष्ट्रात बुधवारी सकाळी 7 पासून ते सांयकाळी 6 वाजेंपर्यंत मतदान पार पडले.

मतदानाच्या दिवशी म्हणजे बुधवारी संध्याकाळी आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 63 टक्के मतदान झाले होते. संध्याकाळी सहा वाजता रांगेंत उभा असलेल्या नागरिकांना मतदान करण्याची परवानगी असते. या नियमानुसार अनेक ठिकाणी पुढचे काही तास मतदान सुरू होते. अनेक ठिकाणी शेवटच्या तासात मोठी रांग होती. त्यामुळे मतदानाच्या टक्क्यांमध्ये वाढ झाली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात पार पडलेल्या मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 65.11 टक्के मतदान झाले आहे.

 

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय संध्याकाळी ६ पर्यंतच्या मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे : 

अहमदनगर – 71.73 टक्के

अकोला – 64.98 टक्के

अमरावती – 65.57 टक्के

औरंगाबाद – 68.89 टक्के

बीड – 67.79 टक्के

भंडारा – 69.42 टक्के

बुलढाणा – 70.32 टक्के

चंद्रपूर – 71.27 टक्के

धुळे – 64.70 टक्के

गडचिरोली – 73.68 टक्के

गोंदिया – 69.53 टक्के

हिंगोली – 71.10 टक्के

जळगाव – 64.42 टक्के

जालना – 72.30 टक्के

कोल्हापूर – 76.25 टक्के

लातूर – 66.92 टक्के

मुंबई शहर – 52.07 टक्के

मुंबई उपनगर – 55.77 टक्के

नागपूर – 60.49 टक्के

नांदेड – 64.92 टक्के

नंदुरबार – 69.15 टक्के

नाशिक – 67.57 टक्के

उस्मानाबाद – 64.27 टक्के

पालघर – 65.95 टक्के

परभणी – 70.38 टक्के

पुणे  - 61.05 टक्के

रायगड – 67.23 टक्के

रत्नागिरी – 64.65 टक्के

सांगली – 71.89 टक्के

सातारा – 71.71 टक्के

सिंधुदुर्ग – 68.40 टक्के

सोलापूर – 67.36 टक्के

ठाणे – 56.05 टक्के

वर्धा – 68.30 टक्के

वाशिम – 66.01 टक्के

यवतमाळ – 69.02 टक्के

 

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान पार पडले आहे. कोल्हापूरात 76.25 टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ गडचिरोली, जालना, सातारा, सांगली, नगर आणि चंद्रपूर या जिल्ह्यात 70 टक्क्यांच्या वर मतदान झाले. देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबईत मात्र मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र आहे. मुंबई शहरात 52.07 टक्के मतदान झाले. तर मुंबई उपनगरात 55.77 टक्के मतदान पार पडले. मुंबईत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून मुंबईत अर्ध्या लोकांनी मतदान केले नसल्याचे चित्र दिसत आहे.   

 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo