Tuesday, December 03, 2024 11:04:14 PM

Ashish Shelar
उद्धव ठाकरेंना शेलारांचा लाल सलाम, ट्वीट व्हायरल

मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्वीट करत मविआच्या जाहीरनाम्यावर टीका केली. ठाकरे सेनेच्या प्रमुखांनाही लक्ष्य करुन टीका केली.

उद्धव ठाकरेंना शेलारांचा लाल सलाम ट्वीट व्हायरल

मुंबई : लाल रंगाची पुस्तिका सदृश वस्तू दाखवत त्याला संविधान म्हणायचे आणि भाजपावर टीका करायची हा मविआचा राजकीय डाव आता त्यांच्यावर उलटवण्यासाठी सत्ताधारी सरसावले आहेत. सत्ताधारी भाजपाकडून मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्वीट करत मविआच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. त्यांनी मविआतील एक घटक पक्ष असलेल्या ठाकरे सेनेच्या प्रमुखांनाही लक्ष्य करुन टीका केली आहे. 

आघाडीचा "महाराष्ट्रनामा" म्हणजे नेमके काय ?
विकास अडवा आणि कंत्राटे जिरवा यापेक्षा काय न्हाय

कोविडमध्ये जनतेने पाहिले यांचे कारनामे
कफनामध्ये पण हे कट - कमिशन खाणारे

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही यांची घोषणा
बगलबच्च्यांना कंत्राटे वाटणे एवढीच यांची रचना

"जय महाराष्ट्र" म्हणणारे एवढे बदललेत
शहरी नक्षलवाद्यांच्या झोळीत जाऊन पडलेत

"कॉम्रेड" हे उबाठा प्रमुखांचे नवे पदनाम
त्यांना आमचा लाल सलाम..! लाल सलाम !!

 

 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo